Ad will apear here
Next
सायंकाळची शोभा
चहुंकडे हिरवे गालीचे!

‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज  भा. रा. तांबे यांची ‘सायंकाळची शोभा’ ही कविता....
.............

पिवळें तांबुस ऊन कोवळें पसरे चौफेर
ओढा नेई सोनें वाटे वाहुनिया दूर.

झाडांनीं किति मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतांत पसरला गुलाल चौफेरी!

हिरवें हिरवेंगार शेत हें सुंदर साळीचें
झोके घेतें कसें, चहुंकडे हिरवे गालीचे!

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे.

अशीं अचल फुलपांखरे फुलें साळिस जणुं फुलती
साळीवर झोपलीं जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरीं उडती!
हिरे, माणकें, पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरें चरोनि होती झाडावर गोळा.
कुठें बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा?
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYXTBE
Similar Posts
खुळा पाऊस ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज पाहू या कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर यांची ‘खुळा पाऊस’ ही कविता.
पोया (पोळा) आज श्रावण अमावास्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाभावाच्या असलेल्या बैलांचं पूजन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच पोळा. त्या निमित्ताने आज ‘पोया (पोळा)’ ही बहिणाबाईंची कविता पाहू या आणि ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ या सदराचा समारोप करू या...
देव अजब गारोडी निसर्गदत्त प्रतिभा असलेल्या आणि रोजच्या जगण्यातल्या गोष्टी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये गुंफणाऱ्या कवयित्री म्हणजे बहिणाबाई. ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज पाहू या बहिणाबाईंचीच एक छान कविता.
पाऊस ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता ’ मध्ये आज पाहू या कवी विठ्ठल वाघ यांची ‘पाऊस’ ही कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language